बापाच्या मांडीवर डोक ठेवुनी तू बघ...
आज तरी बापाच्या मांडीवर
डोक ठेवुनी तू बघ
आहे प्रेमाचा ओलावा त्यात,
तो ओलावा आज तू घेऊन बघ..
तो हि तुझाच विचार करत असतो
रात्र-दिवस लढताना तुला पाहत असतो
अपयशाची तू पायरी चढताना..
तो हि मनातल्या मनात रडत असतो...
स्वताच्या पायाची वहाण तुला देताना
मित्र त्याने तुला बनवले
येणाऱ्या त्या संकटाना लढण्याचे
सामर्थ्य तुला त्यांनी दिले...
त्यांच्या प्रत्येक ओरडण्याला
मनाशी तू लावूनी घेतले
आहे प्रेम तुज बद्दल किती
ते तू कधी न जाणलेस...
ओरडतो माझा बाप किती
असे म्हणुनी तू भडकत राहिलास
बापाच्या डोळ्यातून ओघळणारा अश्रू
एकदाही तू न पाहिलास...
तुझ्या त्या शिक्षणासाठी
पै पै त्याने जोडले..
तुला सुखसोयी देताना
स्वतच्या इच्छांना त्याने मारले...
आहेस तूच उजवा हाथ म्हणुनी
जगाला अभिमानाने सांगितले
करुनी भांडणे बापाशी त्या
त्यालाच शरमेने तू लाजीवले ...
समजतील तुलाही तुझ्या चुका
होशील जेव्हा तू कोणाचा बाप
दुखावूनी बापाच्या भावनांना तेव्हा
होते केलेस किती महापाप....
ओलावा त्या प्रेमाचा
अहूनही मिटला नाही
बापाच्या मांडीवर ठेव डोके,
संधी ती अजूनही गेलेली नाही...गेलेली नाही......









No comments:
Post a Comment
Thank you for sharing you thoughts with us..